काविळीची बाधा आणि यकृत निष्क्रियता

gastroenterologist in pune

हा जागतिक कावीळ प्रतिबंध दिन आहे. मोठ्या प्रमाणावर जनसंख्या सध्या काविळीने संसर्गित होत असल्याचे आढळते. त्यांपैकी १-२ टक्के रुग्णांत आढळणाऱ्या यकृत निष्क्रियतेबद्दलची माहिती.- डॉ. सचिन सु. पळणीटकर (Gastroenterologist in Pune)

gastroenterologist in pune

गंभीर स्वरूपाची यकृत निष्क्रियता ही काविळीची एक दुर्मीळ, अपवादात्मक अवस्था असून, तीत यकृताची कार्यक्षमता अनपेक्षितरीत्या खालावते. बाधित व्यक्तीत रक्त गोठण्याची क्रिया मंदावून रक्त पातळ होते. चेतासंस्थेचा समतोल बिघडतो. कोणत्याही वयोगटात यकृत निष्क्रियता उद्भवू शकते. या अवस्थेत काविळीचा संसर्ग इतर अवयवांपर्यंत पोचून जीवाला धोका पोचू शकतो. यकृत निष्क्रियता म्हणजे काय ?

 

जेव्हा यकृताचे विहित कार्य असंतुलित होते, तेव्हा ते निष्क्रिय म्हणवले जाते. यकृत निष्क्रियतेत यकृताची कार्यक्षमता क्षीण झालेली असते. कारण या अवस्थेत यकृताच्या ८० टक्के पेशी क्षतिग्रस्त झालेल्या असतात. काविळीच्या अतिगंभीर अवस्थेत यकृत निष्क्रियता उद्भवते. अशा रुग्णांत रक्त गोठण्याची क्षमता जागतिक सामान्यीकृत प्रमाणापेक्षा (INR) खालावलेली असते. लक्षणे

 

कावीळ झालेल्या रुग्णांत पोटात उजव्या बाजूस दुखणे, मळमळणे, अंगावर सूज येणे, बुद्धिभ्रम ही लक्षणे आढळतात. बिलिरुबीनची अतिरिक्त प्रमाणात निर्मिती, रक्त गोठण्यास विलंब (Prolnged Prothrombine Time) याबरोबरच अमोनिया, लॅक्टिक अॅसिडचे रक्तात वाढलेले प्रमाण यकृत निष्क्रियतेचे निदर्शक आहेत. कारणे व उपाय

 

यकृत निष्क्रियता ही तीन कारणांनी उद्भवलेली आढळते. १. विषाणू (Virus), २. अतिरिक्त औषधे (Excessive Medicines) व ३. विषारी तत्त्वे (Toxins). यकृत निष्क्रियतेत या घटकांचा प्रादुर्भाव तपासला जातो. त्यावर उपाय करणेच या अवस्थेत महत्त्वाचे ठरते. काही वनस्पतिजन्य औषधीतील विषारी घटकही यकृत निष्क्रियतेस कारणीभूत असतात. यकृत निष्क्रियतेत शारीरिक प्रतिकारशक्ती बाधित होऊन प्रदीर्घ काळ पचनशक्तीत बिघाड झाल्याचे दिसून येते. अतिदक्षता विभागात प्राथमिकता पूरक अथवा सहायक (Supportive) उपायांद्वारे संसर्गाचे प्रमाण व व्याप्ती जाणून घेऊन आजाराच्या

गुंतागुंतीतून होणारी अन्य अवयवांची हानी टाळण्यासाठी उपाययोजना आखली जाते. या अवस्थेतील रुग्णावर काविळीचा इतिहास व सद्यःस्थिती समजून घेऊनच जीवरक्षणासाठी एकात्म उपाय केले जातात. यकृत प्रत्यारोपण काविळीने बाधित रुग्णांमध्ये यकृत निष्क्रियतेची लक्षणे आढळताच त्यांना यकृत प्रत्यारोपणाची सोय असलेल्या रुग्णालयात हलविणे अनिवार्य आहे. मेंदूवर सूज आलेल्या रुग्णास आवश्यक उपचार पुरविणाऱ्या सुसज्ज रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते.

 

यकृत प्रत्यारोपणाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपणासाठी वापरले जाते. निरोगी दाता व्यक्तीच्या यकृताचा काही भाग रुग्णात निष्क्रिय यकृताऐवजी प्रत्यारोपित केला जातो. दुसऱ्या प्रकारच्या प्रत्यारोपणात अपघाताने गंभीर आघाताने मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मेंदू-मृत व्यक्तीच्या अवयवदानास संमती दिल्यास अशा व्यक्तीचे यकृत वैद्यकीय निरीक्षणानुसार प्रत्यारोपणासाठी स्वीकारले जाते.

 

उपचारांबद्दलचे वैद्यकीय निरीक्षण यकृत निष्क्रियतेमुळे कोमात गेलेले रुग्ण सातत्यपूर्ण वैद्यकीय उपचार पुरविले गेल्यास बरे होतात; तथापि याचे प्रमाण २० टक्केच आहे. यकृत हा एक स्वयंपुनःनिर्माणक्षम अवयवांपैकी एक अवयव आहे. क्षतिग्रस्त यकृतही उपचारानंतर काही अवधीत नवीन पेशी निर्माण करू शकते; परंतु गुंतागुंतीच्या आजारात यकृतासह इतर अवयव निकामी होऊन जीवाला धोकाही उद्भवू शकतो. अशा वेळी यकृत प्रत्यारोपणाचा विचार केला जातो.